KALSUBAI {Maharashtra}
Kalsubai ( महाराष्ट्राचे माउंट एव्हरेस्ट ) कळसूबाई शिखर हे नाव शाळेमध्ये असताना भूगोलाच्या पुस्तकात वाचले होते, तेव्हा पासूनच ते सर करण्याची त्यास पाहण्याची प्रचंड उत्कंठा होती. कळसूबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे त्यास महाराष्ट्राचे 'माउंट एव्हरेस्ट' असेही बोलतात.कळसूबाई शिखर हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात आहे. कळसूबाई शिखराची समुद्रसपाटीपासूनची उंची ५४०० फूट म्हणजे १६४६ मीटर आहे. शिखरावर जाण्याचा मुख्य मार्ग भंडारदरऱ्यापासून ६ किलोमीटर असलेल्या बारी गावापासून होतो. नाशिक-इगतपुरी महामार्गावरील घोटी या गावापासून घोटी-भंडारदरा रस्त्याने गेल्यास बारी हे गाव लागते. संगमनेर गावापासूनही भंडारदरामार्गे बारी गावास जाता येते. मी कळसुबाई तसे याआधीही एकदा सर केले होते ते पाहून माझे मित्र मला म्हणाले कि आपण पुन्हा कळसुबाई ला जाऊया ते ऐकून मी त्यांना लगेच होकार दिला कारण मी कळसुबाई हिवाळ्यात सर केला होता आणि आता पावसाळा आहे मला कळसुबाई पावसाळ्यात सर करायचा होता. ठरल्याप्रमाणे ३ जुलै २०१७ रोजी सकाळी सत्यजित, विनय, संकेत आणि मी (वैभव) सकाळी ४.३० च्या सुमारास